पातूरच्या शेतकऱ्यांनी लोकवर्गणी व श्रमदान करून बनविला शेतरस्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:56+5:302021-06-01T04:14:56+5:30
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतरस्ता बंद होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतरस्ता बंद होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या रस्त्याची मागणी केली होती. परंतु, रस्ता पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने कुठलीही पावले उचलली नाहीत. पावसाळा सुरू झाल्यास शेतात पेरणी कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत लोकवर्गणी गोळा केली आणि श्रमदान करून शेतरस्ता बनविला.
फोटो:
या शेतकऱ्यांनी केले श्रमदान
या भागातील शेतकरी शंकरराव बोचरे, गणेश भगत, जितेंद्र बोचरे, प्रशांत बोचरे, मोहम्मद जागीर, मोहम्मद साबिर, रमेश भगत यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावर लोकवर्गणीतून श्रमदान करून भराव टाकून व खडीकरण करून रस्ता पूर्ण केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार झाला आहे.
शिर्ला ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही उपयोग नाही!
शेतकऱ्यांनी येथील पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. शिर्ला ग्रामपंचायतीला प्रस्ताव दिला. ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठराव घेतला आहे. परंतु, कोरोना संसर्ग असल्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. अखेर शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी व श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली.
===Photopath===
300521\3347img-20210530-wa0171.jpg
===Caption===
शेत रस्ता श्रमदाना