पातूर तालुक्यातील शेतकरी पिकविणार गॅस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:47+5:302021-06-11T04:13:47+5:30
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा ...
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पातूर तालुक्यातील नायगाव येथे कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष दामोदर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सावित्री राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्मी डाखोरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, पातूर विकास मंचचे शिवकुमार सिंह बायस ठाकूर, तसेच शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर अर्चना राठोड, शिलाबाई राठोड उपस्थित होत्या. तालुक्यातील नायगाव येथे माळरानावर प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात शेतीतील टाकाऊ कचरा, नेपियर गवत व घरगुती कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधन निर्मितीमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. या ठिकाणी स्वयंपाक, तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती आणण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याचेही कंपनी डायरेक्टर छगन राठोड यांनी सांगितले.
फोटो :
शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न
सुपीक जमीन असेल तर सेंद्रिय किंवा बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न उदाहरणार्थ हत्ती गवत दोन लाखांपासून चार लाखांपर्यंत प्रति हेक्टरी प्रति वर्ष. नापीक किंवा पडीक जमीन असेल तर बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न प्रति हेक्टरी प्रति वर्ष एक लाख रुपये. शेतजमीन नसेलच तर कंपनीच्या पशुपालन, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन व्यवसायात सहभागी होता येईल.
शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीची उद्दिष्टे
हवेत कार्बन सोडणाऱ्या इंधनाला पर्याय असणाऱ्या जैविक इंधनाची निर्मिती
२०२५ पर्यंत चारचाकी, दुचाकी वाहने सीएनजीवर चालविणे. दर दिवसाला शंभर टन नैसर्गिक वायू आणि १५०, तर नैसर्गिक खताची निर्मिती. सेंद्रिय उत्पादनांची साखळी तयार करणे व युवकांना रोजगार देणे, आदी उद्दिष्टे आहेत.