शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:56 PM2019-12-17T13:56:20+5:302019-12-17T13:56:32+5:30
काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणज : केळी पिकाचा २०१८-१९ मध्ये विमा काढूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने पणजच्या शेतकऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात धडक दिली. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन देऊन भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी अधिकाºयांनी वंचित शेतकºयांना एका महिन्याच्या आत लाभ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पणज मंडळ व अकोलखेड महसूल मंडळातील शेतकºयांनी केळी पिकाचा सन २०१८-१९ मध्ये विमा काढला होता. त्या वर्षी वातावरणातील बदलामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांनी विमा कंपनीला कळविल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तसेच काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत. काही शेतकºयांना मदतीचा एक हप्ता मिळाला, दुसरा व तिसरा मिळाला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शेतकºयांना भरपाई मिळाली नाही. अकोल्यातील कार्यालयात चार वेळा भेट देऊनही भरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीचे पुण्यातील कार्यालय गाठले. मागील वर्षी कमी जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपिटीमुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. नुकसान झाल्याविषयी जे शेतकरी इमेल व पंचनामे करू शकले नाही, त्यांनाही लाभ देण्यात यावा, तसेच हवामान केंद्र बंद असल्यामुळे शेतकºयांना तापमानाचा अंदाज येत नाही.
ई-मेल २४ तासात ही अट शिथिल करण्यात यावी व कमी तापमानचा विमा देण्यात यावा आदींसह विविध मागण्या यावेळी शेतकºयांनी विमा कंपनीतील अधिकाºयांसमोर केल्या. यावेळी एका महिन्यात वंचित शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. (वार्ताहर)