पारस येथे शेतक-यांनी काळ्या फिती लावून केला शासनाचा निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:13 AM2017-08-22T00:13:21+5:302017-08-22T00:13:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : येथे पोळा २१ आॅगस्ट रोजी शांततेत साजरा करण्यात आला. तथापि, येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.
शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकºयांचे होत असलेले मरण, चुकीचे आयात धोरण, वन्य प्राण्यांच्या हैदोसाला आळा न घालणे, शेतीमालास मिळत नसलेले उत्पादन खर्चावर आधारित भाव, अद्याप न मिळालेली कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना न मिळालेले २५ हजारांचे अर्थसाह्य, पावसाला खंड पडल्यामुळे झालेल्या नुकसानाचे न झालेले सर्वेक्षण, या सर्व बाबींमुळे शेतकºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात डॉ. दादाराव लांडे, पोलीस पाटील गजानन दांदळे, रमेश तायडे, श्याम खोपडे, अस्सुभाई पठाण, उपसरपंच अ.रफीक , सुरेंद्र खंडारे, संजय इंगळे, वानखडे गुरुजी, सदाशिव बिल्लेवार, पांडुरंग हिवरकार, बाळू भगत, अशोक आंबुसकर, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष शे. जफरभाई, नारायण खंडारे, उद्धवराव लांडे, महादेवराव भगत, दिलीप लांडे, मनोहर कारंजकर, मनोज पुंडे, त्र्यंबक कळम, दीपक काळपांडे, जहाँगीरखान, दुधाळकर, शे.वाहेद यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन केशव नागापुरे यांनी तर आभार श्याम खोपडे यांनी मानले.