निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:30 PM2019-09-25T16:30:38+5:302019-09-25T16:30:47+5:30

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.

Farmers' questions neglected in the process of elections! | निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

Next

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना भेडसावणाºया विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविणे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आता राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, गत दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे कपाशी, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. पीक नुकसानासह विविध समस्या आणि प्रश्नांचा शेतकºयांना सामना करावा लागत असताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

शेतकºयांच्या अशा आहेत समस्या आणि प्रश्न!
 पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसानाचे सर्व्हे प्रलंबित असून, मदतीचा निर्णय अद्याप झाला नाही.
 हमी दराने मूग, उडिदाची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे.
 बहुतांश शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत.
 कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.


राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासन निवडणूक तयारीच्या कामात गुंतले आहे. पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांना भेडसावणाºया विविध प्रश्नांकडे कानाडोळा होत आहे.
- मनोज तायडे
शेतकरी जागर मंच, अकोला.

Web Title: Farmers' questions neglected in the process of elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.