शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:11+5:302021-07-27T04:20:11+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील कुरूम, माना, जामठी, दहातोंड, कानळी, सोनोरी, बपोरी, लोणसना, आमतवाडा, गाजीपूर टाकळी, सिरसो, रेपाडखेड व इतर ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील कुरूम, माना, जामठी, दहातोंड, कानळी, सोनोरी, बपोरी, लोणसना, आमतवाडा, गाजीपूर टाकळी, सिरसो, रेपाडखेड व इतर अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला होता. पुराचे शेतात पाणी शिरून शेती खरडून गेली, तर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कृषिमंत्री भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे, घराच्या पडझडीचे आणि वाहून गेलेल्या गुरांचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. निवेदन पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देताना शुभम मोहोड, आशू भेले, प्रतीक नागरीकर, संकेत मोहोड, शुभम कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती युवराज मोहोड यांनी दिली.