शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:46 PM2018-12-05T18:46:42+5:302018-12-05T18:47:12+5:30

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध ...

Farmers should make 'smart entrepreneurs' - collector | शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी

Next

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच या योजनांबददल त्यांना अधिकाऱ्यां मार्फत सविस्तर मार्गदर्शन करणे. प्रगतीशील शेतकºयांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे तसेच शेतकरी आणि संबधित विभागांचे अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एक दिवस शेतकऱ्यां सोबत असा प्रशासनाचा मानस असून दर बुधवारी शेतकऱ्यां करीता याबाबतची कार्यशाळा नियोजन भवनात राहणार आहे, याचा शेतकऱ्यां नी लाभ घेऊन स्वत: रोजगारक्षम शेती करुन स्मार्ट उदयोजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी केले.
रोजगारक्षम शेती व्यवसाय या अंतर्गत ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणिया, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ठाकरे, रेशीम अधिकारी श्री. मानकर यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
शेतकºयांच्या हितासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतीसोबत शेतकऱ्यां ची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रोजगारक्षम शेती व्यवसाय या सदराखाली जिल्हयातील शेतकºयांना आता स्मार्ट उद्योजक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यां करीता साप्ताहिक मुक्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतकरी स्वत:च स्वयंभू झाला पाहिजे, हा या मागील उदेश आहे. या कार्यशाळेत कृषी, बँक, नाबार्डचे अधिकारी तसेच प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन शेतकºयांना मिळणार आहे. दर बुधवारी ही कार्यशाळा नियोजन सभागृहात राहणार असून शेतकऱ्यां मध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच शेतकºयांना उदयोजक बनविण्याचा या मागे हेतू आहे. या कार्यशाळेत मुक्त संवादाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अडचणी मांडू शकतात.

मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण
प्रारंभी जमीन आरोग्य पत्रिकांचे प्रातिनिधीक स्वरुपात शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये प्रकाश घोडस्कर, सूर्यभान इंगळे, गजानन घोंगे, मनोहर बाबर, विष्णु सोनाग्रे, गणेश घोडस्कर, जनार्दन नांदुरकर, वसंत सोनाग्रे यांचा समावेश होता. जागतिक मृदा दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन निकम यांनी यावेळी केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्यासह तराणिया, कुलकर्णी, वाळके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मृदा चाचणी अधिकारी मिनल म्हस्के, यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक नंदू वानखेडे व मंडळ अधिकारी बोडखे यांनी केले तर निकम यांनी आभार मानले.

 

Web Title: Farmers should make 'smart entrepreneurs' - collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.