शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, कुटुंबाचा विचार करा -  अरविंद सावंत यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:34 PM2018-11-20T12:34:53+5:302018-11-20T12:35:27+5:30

शेतकºयांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन करीत शिवसेना कायम तुमच्या पाठीशी असल्याचे सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

 Farmers should not commit suicide, think of the family - Arvind Sawant | शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, कुटुंबाचा विचार करा -  अरविंद सावंत यांचे आवाहन 

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, कुटुंबाचा विचार करा -  अरविंद सावंत यांचे आवाहन 

googlenewsNext

अकोला: छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला आलेल्या शेतकºयांनी परिस्थितीशी दोन हात करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण,पत्नी व चिमुकल्यांचा विचार करा, जीवन संपविणे हा समस्येवरील उपाय होऊ शकत नाही, असे सांगत शेतकºयांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन करीत शिवसेना कायम तुमच्या पाठीशी असल्याचे सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १०७ शेतकरी कुटुंबातील सदस्यांना अन्नधान्य व साडी-चोळीचे वाटप करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात कृतज्ञता सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला संपर्क प्रमुख मधुरा देसाई, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरू मकार, दिलीप बोचे, रवींद्र पोहरे, शहर प्रमुख (पूर्व)अतुल पवनीकर, शहर प्रमुख (पश्चिम)राजेश मिश्रा, महिला सहसंघटिका ज्योत्स्रा चोरे, अकोला पूर्व संपर्क संघटिका वैशाली घोरपडे, महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, माया म्हैसने, पं.स.समिती सभापती गंगा अंभोरे, रेखा राऊत, सरिता वाकोडे, लता साबळे, वर्षा पिसोळे, राजेश्वरी शर्मा उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शेतकºयांना भेडसावणाºया समस्या व वेदनांची जाण होती. शेतात जीवाचे रान करणाºया कष्टकरी शेतकºयांमुळे आपण सर्व जिवंत आहोत, याचे सर्वांनी भान ठेवण्याची गरज आहे. तरीही त्यांची शासनाकडून उपेक्षा केली जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बळीराजाप्रती कृतज्ञता सोहळ््याचे आयोजन केले असून, आमचा मायेचा आधार सर्वांना जगण्याचे बळ देईल,अशी अपेक्षा व्यक्त करीत असल्याचे संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत यावेळी म्हणाले. सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनीसुद्धा शेतकºयांना आत्महत्या न करण्याचे आवाहन यावेळी केले.

 

Web Title:  Farmers should not commit suicide, think of the family - Arvind Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.