शेतकर्यांनी खामगाव कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा - आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:29 IST2018-02-17T02:29:38+5:302018-02-17T02:29:52+5:30
अकोला : खामगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपाच्यावतीने लोकप्रतिनिधींनी केले आहे.

शेतकर्यांनी खामगाव कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा - आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खामगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपाच्यावतीने लोकप्रतिनिधींनी केले आहे.
खामगाव येथे १६ ते २0 फेब्रुवारीदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी १0 वाजता शासकीय तंत्रनिकेतन मैदान, खामगाव येथे प्रदर्शनास भेट देऊन अन्नदाता शेतकर्यांशी सुसंवाद साधणार आहेत. या प्रदर्शनात अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व वाशिम येथील स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हा प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.
या प्रदर्शनाला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.