शेतकऱ्यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे - उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:25 PM2018-12-19T16:25:14+5:302018-12-19T16:25:41+5:30

अकोला :  रेशीम शेती ही फायदयाची शेती आहे. या शेतीकरीता शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. यामुळे शेतक-यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले.

Farmers should turn to silk farming for economic development - Deputy Collector Ashok Amankar | शेतकऱ्यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे - उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर

शेतकऱ्यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे - उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर

Next

अकोला :  रेशीम शेती ही फायदयाची शेती आहे. या शेतीकरीता शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. यामुळे शेतक-यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले.
 रोजगारक्षम शेती व्यवसाय  या सदराखाली शेतकरी हा स्मार्ट उद्योजक  हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता प्रत्येक बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून साप्ताहिक मुक्त कार्यशाळा आयोजीत करण्यात येत असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत रेशीम शेती व रेशीम उदयोग या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रेशीम विकास अधिकारी एस.एस. शिंदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके , रेशम विभागाचे क्षेत्र सहाय्यक ए.यु. मानकर प्रकल्प अधिकारी विजय ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमातंर्गत तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन योजनातंर्गत पावसाळी हंगाम तुती लागवडीकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणी चालु आहे. जिल्हा रेशीम कार्यालय अकोला येथे रेशीम शेती करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतक-यांनी आपली नोंदणी 29 डिसेंबर 2018 पर्यंत करावी व या योजनेंचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्हा करीता सन 2019 -20 करीता 300 एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आलेला आहे. यासाठी अल्पभुधारक शेतकरी पात्र आहेत. या योजनेसाठी शेतक-यांच्या नावावर सातबारा असावा शेतकरी 5 एकर पेक्षा शेती नसावी . बारमाई ओलीताची सोय असावी तुती लागवड करून सतत तीन वर्ष कोष उत्पादक करण्याची तयारी असावी. मनरेगातंर्गत स्वत:च्या शेतात काम करणा-यांना मजुरी शासनाकडून दिली जाणार आहे. तसेच यासाठी लागणा-या साहित्याची खरेदीसाठी रक्कम देण्यात येणार आहे. अनुदानामध्ये तुती लागवड जोपासना मजुरी खर्च उदा. जमीन तयार करणे, सरी पाडणे, तुती लागवड करणे, आंतर मशागत , पाणी देणे , रासायनिक जैविक खते देणे यासाठी तीन वर्षात 1 लाख 38 हजार पर्यंत खर्च देण्यात येईल. तसेच साहित्य खरेदी खर्च उदा. तुती रोप खरेदी , जैविक खत , रेशीम किटक संगोपन साहित्य, स्प्रे पंप खरेदी, यासाठी 61 हजार पर्यंत खर्च शासनाकडून देण्यात येणार आहे. तरी इुच्छूक शेतक-यांनी जिल्हा रेशीम कार्यालय अकोला येथे संपर्क साधावा. याशिवाय शासनाकडून केद्रिंय रेशीम विभागाची सिड संमग्र योजना राबविण्यात येते. यातही शेतक-यांना रेशीम शेती करिता अनुदान देण्यात येते.

या कार्यशाळेमध्ये अकोला जिल्ह्यातील रेशीम शेती व शेती पूरक रेशीम उदयोगाबाबत काही प्रगतीशील शेतक-यांनी संवाद साधुन आपले अनुभव कथन केले. अंबाशी येथील रेशीम शेतकरी देवराव सुखदेव लाहोळे यांनी रेशीम शेतीक करून महिन्याकाठी 1 लाख पर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले. नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था पांगर ताठी येथील शेतकरी शंकर आत्माराम जाधव यांनी वॉटरकप प्रतियोगिता मध्ये भाग घेवून प्रापत झालेल्या 18 लक्ष रूपयांच्या बक्षीसाच्या रकमेचा विनीयोग रेशीम शेती करण्यासाठी शेतक-यांना अनुदान म्हणून खर्च करण्यात आला. यातून मागील वर्षी 25 शेतकरी तयार करण्यात आले. या वर्षी 100 शेतकरी रेशीम शेतीसाठी तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

रेशीम रोप , कोष व चॉकी (लहान अळीची अवस्था) आदींची विक्री करून मागीलवर्षी 9 लाख रूपये उत्पन्न झाले असल्याचे माहिती पांडुरंग वसंत गि-हे आलेगाव यांनी दिली. त्यांच्या रेशीम शेती मधील प्रगती बघून आलेगावांतील सुमारे 90 शेतकरी रेशीम लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एरंडा येथील सुर्या सिड इंडसिट्रजचे प्रकाश विठ्ठलराव डोगंरे यांनी पॉवरलुमचा उपयोग करून डिझायनर रेशमी साडी तयार करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. यासाठी लागणारे रेशीम ते स्वत: उत्पादीत करीत असतात. नुसते रेशम शेती न करता शेतक-यांनी रेशीम पासुन कापड बनविण्याचा उद्योग करावा असे त्यांनी शेतक-यांना सांगितले.

रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक ए.यु. मानकर यांनी शासनानी रेशीम ग्राम योजना सुरू केली असून गावातच अंडी पुंज निर्मिती केंद्रे , रेशीम कोष निर्मिती , चॉकी, उत्पादीत रेशीम ग्रामस्थ , धागा तयार करणे, धाग्यापासुन कापड तयार करणे व त्यांची विक्री केंद्र एका गावातच सुरू करावी असे रेशीम ग्राम तयार करण्यात यावे यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला जिल्हयात पातुर येथे या प्रकारचे रेशीम ग्राम तयार करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय प्रयत्न करीत असल्याचे श्री. मानकर यांनी सांगितले. सदर कार्यशाळेस मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers should turn to silk farming for economic development - Deputy Collector Ashok Amankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.