शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:23 AM2021-08-27T04:23:31+5:302021-08-27T04:23:31+5:30

प्रत्येक गावात गटनिहाय युवकांना बरोबर घेऊन किमान १५ ते २० युवकांचा एक गट तयार करून, गावातील युवकांना ॲप प्रशिक्षण ...

Farmers should use e-crop survey app! | शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा!

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा!

Next

प्रत्येक गावात गटनिहाय युवकांना बरोबर घेऊन किमान १५ ते २० युवकांचा एक गट तयार करून, गावातील युवकांना ॲप प्रशिक्षण देणेबाबत तहसीलदार प्रदीप पवार यांनी मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक व मंडळ अधिकारी तलाठी यांना आदेश दिले आहेत. सर्व ग्रामस्तरीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच लोकप्रतिनिधी व संघटना पदाधिकारी यांना ई-पीक पाहणी ॲप वापराकरिता शेतकऱ्यांना प्रचार, प्रबोधन यासाठी समाविष्ट करून घेऊन गावातील तरुण युवकांच्या सहकार्याने तलाठी व कृषी सहायक यांनी जास्तीतजास्त शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपचा वापर करणेसाठी प्रशिक्षित करून त्यांना “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा” या संकल्पनेतून शेतकरी यांना सक्षम करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. ई पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे स्वतःचा पीक पेरा स्वतः भरल्यास याच ॲपची माहिती शासनाचे विविध योजनांसाठी उपयोगी येणार असून, शेतकरी यांना कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे इत्यादी लाभ होणार आहेत.

फाेटो :

ई-पीक ॲपबाबत गावागावांमध्ये प्रचार

मूर्तिजापूर तालुक्यात तलाठी, कृषी सहायक व मंडळ अधिकारी यांच्याकडून ई पीक पाहणी मोबाइल ॲपबाबत गावागावांमध्ये करण्यात येणाऱ्या प्रचार, प्रबोधन-प्रशिक्षण कार्यक्रमास तहसील कार्यालय, मूर्तिजापूर येथील सर्व नायब तहसीलदार व स्वतः तहसीलदार आकस्मिक भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करून ई पीक पाहणी ॲपबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यामध्ये निभा, धानोरा पाटेकर, कंझरा, चिंचखेड व इतर विविध ठिकाणी तहसीलदार प्रदीप पवार यांनी स्वतः शेतकऱ्यांना मोबाइलमध्ये कशा पद्धतीने स्वतःचा पीक पेरा अद्ययावत करावा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.

विशेष पंधरवडा राबविणार

ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःचा पीक पेरा स्वतःच भरून घेण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यात दिनांक २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ई-पीक पाहणीबाबत विशेष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. तसेच ३१ ऑगस्ट रोजी सर्व महसूल व कृषी अधिकारी एक दिवस ई-पीक पाहणी या कामासाठी यादृष्टीने ई-पीक पाहणीबाबतचे काम करतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: Farmers should use e-crop survey app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.