शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Published: March 13, 2017 02:35 AM2017-03-13T02:35:32+5:302017-03-13T02:35:32+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील घटना.

Farmer's son commits suicide | शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. १२- नजीकच्या साखरी येथील एका २५ वर्षीय शेतकरी पुत्राने शेता त गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ मार्च रोजी सकाळी घडली.
साखरी येथील शेतकरी अरुण गवई यांचा २५ वर्षीय मुलगा विकास अरुण गवई याने रविवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विकासचे वडील अरुण गवई यांना दोन महिन्यांपूर्वी अर्धांंगवायू झाल्याने घराची जबाबदारी विकासच्या अंगावर आली होती.
विकासचे बीएसस्सीपर्यंंत शिक्षण झाले होते. त्याच्या वडिलांच्या नावे अडीच एकर शेतजमीन असून, त्या शेतीवर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज आहे. मागील दोन वर्षांंपासून शेतात सातत्याने नापिकी झाली. त्यातच यंदा पिकाला सद्यस्थितीत कमी भाव मिळत असल्याने बँकेच्या पीक कर्जाची परतफेड कशी करायची, या काळजीने ग्रस्त झालेल्या विकासने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. विकासच्या पश्‍चात आई-वडील, एक लहान भाऊ, एक विवाहित व दुसरी अविवाहित अशा दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmer's son commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.