आपातापा येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या
By Admin | Published: August 31, 2016 02:57 AM2016-08-31T02:57:27+5:302016-08-31T02:57:27+5:30
आपातापा येथे दिव्यांग असलेल्या शेतकरी पुत्राने गळफास घेतला.
आपातापा(जि. अकोला)३0: बोरगाव मंजू पो. स्टे. अंतर्गत येत असलेल्या आपातापा येथील दिव्यांग शेतकरी पुत्र नीलेश शेषराव बोपटे (२३) याने सकाळी ५:३0 वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आला. तेव्हा त्याला ताबडतोब अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी त्याच्यावर आपातापा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.