गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या

By admin | Published: June 28, 2015 11:20 PM2015-06-28T23:20:02+5:302015-06-28T23:20:02+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

Farmer's son suicides with lynching | गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या

गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या

Next

सुलतानपूर (जि. बुलडाणा): येथील २७ वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या रात्रीदरम्यान घडली. येथील अल्पभुधारक शेतकरी शे.ख्वाजा शे.हसन अतार याच्याकडे २ एकर शेत असून, त्यांचेवर बँकेचे कर्ज आहे. वयोवृद्ध शे.ख्वाजा व त्यांची पत्नी हे नेहमी आजाराने त्रस्त असत. घराची संपूर्ण जबाबदारी त्यांचा धाकटा मुलगा शेख नूर शेख ख्वाजा (२७) याच्यावरच होती. तो शेती मोलमजुरीच्या भरवशावर घर चालवित असे. बँकेचे कर्ज व नापिकीमुळे त्रस्त झाल्याने शेख नूर शेख ख्वाजा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे पश्‍चात वृद्ध आई-वडील, पत्नी, भावंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmer's son suicides with lynching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.