शेतकरी पुत्रांचे अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: March 19, 2017 01:35 PM2017-03-19T13:35:45+5:302017-03-20T03:00:49+5:30
स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मागण्यासाठी रविवार, १९ मार्च रोजी शेतकरी व शेतकरी पुत्र एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
अकोला : संवेदनेच्या पातळीवर बळीराजाच्या वेदना अनुभवण्याचा व न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मागण्यासाठी रविवार, १९ मार्च रोजी शेतकरी व शेतकरी पुत्र एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील सधन शेतकरी स्व साहेबराव करपे आपल्या पत्नी मालतीताई यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकटुंब शेतकरी विरोधी धोरणांना कंटाळून सामूहीक आत्महत्या केली.तेंव्हापासून सुरु झालेले आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे शेतकरीविरोधी धोरणे व कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हा यांच्यावतीने एक दिवसाचे सामूहिक अन्नत्याग आंदोलन स्थानिक गांधी-जवाहर बाग येथे केले. यावेळी शेतकरी संघटना युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, डॉ.निलेश पाटील, प्रशांत बुले, दिवाकर पाटील, पंकज जायले, आनंद सुकळीकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.