शेतकरी सुकाणू समिती करणार ‘रेल रोको’!
By admin | Published: June 11, 2017 02:36 AM2017-06-11T02:36:30+5:302017-06-11T02:36:30+5:30
शेतकरी सुकाणू समितीचे करणार आंदोलन!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय सुकाणू समिती एकवटली असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे, तर मंगळवारी रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
बैठकीत शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, कृष्णा अंधारे, जगदीश पाटील मुरूमकार, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, विजय देशमुख, शिवाजी म्हैसने, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष अविनाश नाकट, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, युवा आघाडीचे शैलेष बोदडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, गोपाल दातकर, प्रहारचे दत्ता पाटील पागदुणे, छावाचे रणजित काळे, सुधाकर पाटील, प्रमोद देंडवे, विदर्भ मुक्ती मोर्चाचे धनंजय मिश्रा, युवा राष्ट्रचे नीलेश पाटील, विलास ताथोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिपचे अध्यक्ष बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशिराम साबळे, दिनकर वाघ, ज्ञानेश्वर सुलताने, भारत कृषक समाजाचे प्रकाश मानकर, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, गजानन वारकरी, सम्राट डोंगरदिवे, शेकापचे भाई प्रदीप देशमुख, विद्या जवके, टिना देशमुख यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलनामध्ये महिला व मुलाबाळांसह उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत सर्वांनी केले.