नया अंदुरा परिसरात पावसामुळे उडाली शेतकऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:34 AM2021-02-18T04:34:13+5:302021-02-18T04:34:13+5:30
नया अंदुरा, कारंजा रमजानपूर, अंदुरा, शिंगोली, हाता व निंबा परिसरात हरभरा पीक चांगले बहरले होते. पावसामुळे शेतकऱ्यांना हरभरा ...
नया अंदुरा, कारंजा रमजानपूर, अंदुरा, शिंगोली, हाता व निंबा परिसरात हरभरा पीक चांगले बहरले होते. पावसामुळे शेतकऱ्यांना हरभरा सोंगणी थांबवावी लागली. तसेच काही शेतकऱ्यांनी हरभरा सुड्याही लावून ठेवल्या तर काही शेतकऱ्यांनी सोंगणी करून हरभरा जागेवर ठेवला होते. सोंगणी केलेल्या हरभरा काढणीसाठी शेतकरी मळणीयंत्राचा शोध घेत होते. अशातच बुधवारी सकाळी सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील हरभरा झाकून ठेवण्यासाठी एकच तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्री घेऊन शेतमजुरांच्या मदतीने शेतातील हरभरा गंज्या झाकल्या तर काही शेतकऱ्यांचा सोंगून ठेवलेला हरभरा पावसाच्या पाण्याने भिजल्याने नुकसान झाले. हरभरा भिजल्याने दर्जा खालावणार असून, बाजारात कवडीमोल भावाने हरभरा विकावे लागणार आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
फोटो: