शेतकरी संघर्ष समितीचा बाश्रीटाकळी तहसीलवर मोर्चा

By Admin | Published: November 7, 2014 11:11 PM2014-11-07T23:11:54+5:302014-11-07T23:11:54+5:30

विविध मागण्यांचे निवेदन सादर, १५00 शेतक-यांचा सहभाग.

Farmer's struggle committee's bashritakali tehsilwar front | शेतकरी संघर्ष समितीचा बाश्रीटाकळी तहसीलवर मोर्चा

शेतकरी संघर्ष समितीचा बाश्रीटाकळी तहसीलवर मोर्चा

googlenewsNext

बाश्रीटाकळी (अकोला): आपल्या विविध मागण्यांसाठी बाश्रीटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. समितीचे प्रमुख सुनील धाबेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील सुमारे १५00 शेतकरी उपस्थित होते.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न धुळीस मिळाले आहे. हजारो रुपये खचरून पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतरही निसर्गाने दगा दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी, तूर, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ७१ पैसे आणेवारी चुकीची असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. ही आणेवारी रद्द करण्यासह वीज बिल माफ करणे, पीक कर्ज माफ करणे, कृषी फिडरवर दिवसा भारनियमन न करणे, शेतकर्‍यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत जारी करणे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, कपाशीची शासकीय खरेदी लवकर सुरू करणे, चारा डेपो सुरू करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करणे आदी न्याय मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस.एस. सानप यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Farmer's struggle committee's bashritakali tehsilwar front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.