शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 9, 2017 12:26 AM2017-07-09T00:26:55+5:302017-07-09T00:26:55+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी नापिकी व मुलामुलींच्या लग्नासाठी खासगी लोकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी नापिकी व मुलामुलींच्या लग्नासाठी खासगी लोकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत सापडलेल्या एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मासळ येथे घडली. प्रभाकर मारोती दोनोडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
दोनोडे यांच्याकडे १.७३ हेक्टर जमीन असून त्यांच्या नावे ०.३० आर जमीन आहे. त्यांना चार मुली व १ मुलगा आहे. मुलांच्या लग्नासाठी लोकाकडून पैसे घेतले होते. या पैशाची परतफेड मोलमजुरी करून केली. मात्र पुन्हा दीड लाख रूपये देणे होते. अशातच सेवा सहकारी संस्थेकडून २२ हजार कर्जाची परतफेड झाली नव्हती.