गायगाव येथे शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: January 15, 2016 02:02 AM2016-01-15T02:02:12+5:302016-01-15T02:02:12+5:30
सततची नापिकी व बँकेच्या थकीत कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.
गायगाव (अकोला): येथील एका ५0 वर्षीय शेतकर्याने सततची नापिकी व बँकेच्या थकीत कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपूर्वी घडली. येथील विठ्ठल वसंत भाकरे (५0) यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्याकडे स्थानिक विदर्भ ग्रामीण बँकेचे ५0 हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यांनी दरवर्षी होणारी नापिकी व बँकेच्या थकीत कर्जाच्या परतफेडीच्या विवंचनेमुळे गुरुवारी दुपारी घरात कुणी नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सदर घटना त्यांचे कुटुबातील अन्य लोक बाहेरून घरी आल्यानंतर उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे.