तंत्रज्ञानात देश प्रगती करीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:29 AM2019-12-28T10:29:27+5:302019-12-28T10:29:37+5:30

शेती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर उपाययोजना नसतील तर शिक्षण व्यर्थ आहे, अशा शब्दात पद्मभूषण परम सुपर संगणकाचे जनक व नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी खंत व्यक्त केली.

 Farmers' suicide is painful as the country advances in technology! | तंत्रज्ञानात देश प्रगती करीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी!

तंत्रज्ञानात देश प्रगती करीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ६८ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचे उत्पादन वाढत आहे. भारत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करीत आहे. असे असतानाही शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या वेदनादायी आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षण घेतले, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ झालो. शेती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर उपाययोजना नसतील तर शिक्षण व्यर्थ आहे, अशा शब्दात पद्मभूषण परम सुपर संगणकाचे जनक व नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी खंत व्यक्त केली.
शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात विशेष मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दिन जव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, अर्चना बारब्दे, मोरेश्वर वानखडे, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी.जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, अधिष्ठाता (निम्न कृषी शिक्षण) डॉ. डी. बी. उंदिरवाडे, अधिष्ठाता (उद्यानविद्या) डॉ. पी. के. नागरे, सहसंचालक कृषी सुभाष नागरे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग बोर्डाचे व्यवस्थापक (निर्यात) डॉ. सतीश वराळे, पुणे येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड, प्रगतशील शेतकरी दिलीप फुके आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भटकर पुढे म्हणाले, शेतकºयांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी कृषी प्रदर्शनाची गरज आहे. रासायनिकयुक्त धान्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे. त्यासाठी जैविक, गो-आधारित शेतीकडे शेतकºयांनी वळले पाहिजे, असे सांगत, कॅन्सरसारख्या आजाराला अमेरिकेसारखा देश त्रस्त झाला असून, कॅन्सरवर उपाययोजना करण्यासाठी ते भारताकडे बघत आहेत आणि त्याचे उत्तर गो-आधारित शेती, पंचगव्य शेती व वैदिक तत्त्वावर आधारित जैविक शेतीच आहे, असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी, एकेकाळी शेती नफ्याची होती. एक क्विंटल कापसाचा भाव एक तोळे सोन्यापेक्षा अधिक होता. काळानुरूप परिस्थिती बदलली. सोन्यासोबतच इतर सर्व उत्पादनांचे भाव वाढले; परंतु शेतमालाचे भाव वाढले नाही. उत्पादनात वाढ झाली; परंतु शेतकºयाची आर्थिक स्थिती कमजोर झाली. उत्पादन खर्च वाढला. शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने धोरण ठरवून उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव, शेतमालाची आयात बंद करावी. तंत्रज्ञानाची जोड देऊन जैविक शेतीवर शासनाने भर द्यावा, असे मत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी स्वर्णिम कालावधीतील विद्यापीठाच्या उपलब्धी विषयी संशिप्त आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी, तर संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. आभार डॉ. किशोर बिडवे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title:  Farmers' suicide is painful as the country advances in technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.