शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 01:57 PM2020-01-10T13:57:09+5:302020-01-10T13:57:20+5:30

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.

Farmers suicide prevention proposal | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रस्ताव!

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रस्ताव!

googlenewsNext

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांचा प्रस्ताव वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे.
गत महिन्यात राज्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या पृष्ठभूमीवर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेऊन, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.
पतपुरवठा धोरण नियंत्रण, लागवडीचा खर्च व शेतीमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी निधीचे व्यवस्थापन, जलसंपत्तीचे समान वाटप व जमिनीखालील जलसंपत्तीचे नियंत्रण, पीक पद्धतीचे नियोजन, सक्षम विपदा प्रबंधन प्रणालीचे संचालन व नियंत्रण, शेतीमाल संरक्षण व शेतीमाल साठवण प्रक्रिया व्यवस्थेचे नियोजन इत्यादी क्षेत्रात शेतकºयांचे भूअधिकार अबाधित ठेवून मूलभूत परिवर्तन करण्याची पद्धत आणि प्रशासकीय आराखड्यामध्ये सुधारणा करून एकात्मिक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या या प्रस्तावासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करा!
मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या प्रस्तावात केली आहे.

Web Title: Farmers suicide prevention proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.