कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: July 2, 2017 09:28 AM2017-07-02T09:28:57+5:302017-07-02T09:28:57+5:30
सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून वाडेगाव येथील संदीप विश्वभर नानोटी (५६) या शेतकºयाने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव (जि. अकोला): सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून वाडेगाव येथील संदीप विश्वभर नानोटी (५६) या शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १ जुलै रोजी वाडेगाव येथे घडली.
वाडेगाव येथील संदीप विश्वभर नानोटी यांच्याकडे दीड एकर शेत आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर त्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यांच्यावर चार ते पाच लाख रुपयांचे बँकेचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतच संदीप नानोटी यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी तीन भाऊ असा आप्त परिवार आहे.