दुबार पेरणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 7, 2017 01:53 AM2017-07-07T01:53:53+5:302017-07-07T01:53:53+5:30
दिग्रस बु. (जि. अकोला) : सततची नापिकी व दुबार पेरणीच्या संकटाला कंटाळून रामदास संपत हिवराळे (६५) या शेतकऱ्याने शेतामधील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस बु. (जि. अकोला) : सततची नापिकी व दुबार पेरणीच्या संकटाला कंटाळून रामदास संपत हिवराळे (६५) या शेतकऱ्याने शेतामधील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या तुलंगा बु. येथे ६ जुलै रोजी सकाळी घडली.
रामदास हिवराळे यांच्याकडे दोन एकर जमीन असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. गुरुवारी रामदास हिवराळे हे नेहमीप्रमाणे त्यांच्याकडील गाय व वासराला चारण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्यांनी दोरीने गळफास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. पोलीस पाटील अशोक तायडे यांनी पोलीसांना कळविले. त्यानंतर तायडे यांनी माजी सरपंच देवराव हातोले, दादाराव हातोले, पटवारी पी. बी. खंडारे, कोतवाल गजानन वैराळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.