ताननापूर येथील शेतकऱ्यांची मृद, जलसंधारण उपविभागीय कार्यालयात धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:26+5:302021-02-05T06:13:26+5:30

अकोट : तालुक्यातील ताजनापूर परिसरात पाणी टंचाईचे संकट पाहता येथे शेततलाव करण्याचे नियोजन होते. दरम्यान, मात्र २००७ पासून शेततलावाचा ...

Farmers in Tannapur hit in soil, water conservation sub-divisional office! | ताननापूर येथील शेतकऱ्यांची मृद, जलसंधारण उपविभागीय कार्यालयात धडक!

ताननापूर येथील शेतकऱ्यांची मृद, जलसंधारण उपविभागीय कार्यालयात धडक!

Next

अकोट : तालुक्यातील ताजनापूर परिसरात पाणी टंचाईचे संकट पाहता येथे शेततलाव करण्याचे नियोजन होते. दरम्यान, मात्र २००७ पासून शेततलावाचा प्रस्ताव शासन दरबारी पडून असल्याने शेतकऱ्यांची समस्या जैसे थे आहे. दुसरीकडे तलावासाठी संपादित केलेल्या जमीनधारकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेततलावाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील ताजनापूर परिसरात पाण्याच्या भीषण परिस्थिती असल्यामुळे येथे शेततलावाचे नियोजन केले होते. या तलावाच्या कामाचा प्रस्ताव २००७ पासून शासन दरबारी पडून आहे. दरम्यान, या काळात शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले; त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. तसेच तलावाचे काम अपूर्णच आहे. अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये तलावाच्या कामाला स्थगिती दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तलाव कामासाठी एकूण ३७ शेतकऱ्यांपैकी ६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली. ३१ शेतकऱ्यांनी जमीन संपादित करूनही खरेदी केली नाही. त्यामुळे तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी अकोट येथील मृद, जलसंधारण उपविभागीय कार्यालयात धडक देत निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल डोबाळे, प्रवीण डिक्कर, किशोर देशमुख, सागर उकंडे, सरपंच प्रतिभा मेंढे, किसनराव डोबाळे, कोकिलाबाई डोबाळे, शकुंतलाबाई डोबाळे, गंगाबाई डोबाळे, उषाबाई डोबाळे, वेणूबाई सावरकर, संगीता डोबाळे, जयश्री डोबाळे, किसनराव डोबाळे, विठ्ठलराव डोबाळे, नंदकिशोर डोबाळे, रमेश डोबाळे, गजानन डोबाळे, शेषराव डोबाळे, ज्ञानेश्वर डोबाळे, गजानन ढोले, सुमित डोबाळे, निखिल डोबाळे, मधुकर डोबाळे, रवी मेंढे, वसंतराव डोबाळे, पंजाबराव बहादुरे, मधुकर बहादुरे, मो.वासिक, श्रीकृष्ण डोबाळे, दीपक डोबाळे, विजय डोबाळे, मो. आरिफ मो. हाजिक, संगीता अमृत तेलगोटे, मो. आशिफ शहा आदी शेतकरी उपस्थित होते. ...................(फोटो)

Web Title: Farmers in Tannapur hit in soil, water conservation sub-divisional office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.