शेतकर्यांनी कांदा फेकला
By admin | Published: June 23, 2017 04:13 PM2017-06-23T16:13:59+5:302017-06-23T16:13:59+5:30
पेरणीलाही सुरुवात झाली. परंतु अद्यापही कांद्याच्या भावमध्ये खर्च लावले त्याप्रमाणे भाव वाढले नाही.
पेरणीला सुरुवात, भावात अद्यापही वाढ नाही
खेट्री : नजीकच्या चतारी येथे शेतकर्यांनी कांदा रस्त्यावर फेकला, कांदा काढला तेव्हापासूनच शेतकर्यांनी भाव वाढविण्याच्या प्रतीक्षेत कांदा गोठय़ात ठेवला होता. परंतु पावसाळा सुरू झाला, पेरणीलाही सुरुवात झाली. परंतु अद्यापही कांद्याच्या भावमध्ये खर्च लावले त्याप्रमाणे भाव वाढले नाही. त्यामुळे चतारी येथील संतप्त झालेल्या शेतकर्यांनी अखेर कांदा रस्त्यावर फेकल्याचे चित्र समोर आले. कर्ज माफीची घोषणा झाली असली तरी, सध्या शेतकर्यांजवळ पेरणीसाठी पैशाच नाही. त्यामुळे बँकांनी त्वरित घोषणेप्रमाणे पेरणीला दहा हजार रुपये देण्याची मागणी चतारी खेट्री आदी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे. (वार्ताहर)