परंपरागत पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी घेतले अश्वगंधा पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:27+5:302021-01-16T04:22:27+5:30
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सेंद्रिय शेतकरी व शेतीनिष्ठ राजेंद्र ताले यांनी परंपरागत पिकांना फाटा देत अश्वगंधा पिकाची लागवड ...
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सेंद्रिय शेतकरी व शेतीनिष्ठ राजेंद्र ताले यांनी परंपरागत पिकांना फाटा देत अश्वगंधा पिकाची लागवड केली आहे.
खरिपातील तुरीचे पीक, ज्वारी पीक, कपाशी आदी पिके घेऊन उत्पन्नात भर पडत नव्हती. या पिकांना फाटा देत येथील शेतकरी राजेंद्र ताले यांनी अश्वगंधा पिकाचे बियाणे स्थानिक अकोला पंजाबराव कृषी विद्यपीठातून विकत आणून त्या पिकाची लागवड केली. या पिकाचे एकरी उत्पन्न पाच ते सहा क्विंटल होत असून, अंदाजे १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे शेतकरी राजेंद्र ताले यांनी सांगितले. या अश्वगंधा पिकाची बाजारपेठ अकोला विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अश्वगंधाला कोविड-१९ या आजारावर उपचार म्हणून वापरण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. अकोला विद्यापीठाचे शास्त्रज्ञ खडसे, जिल्हा कृषी अधीक्षक नलावडे आदी कर्मचाऱ्यांनी पिकाची पाहणी केली. पीक पाहून शेतकऱ्याचे कौतुक केले. दिग्रस बु. परिसरात अश्वगंधाचे आगळेवेगळे पीक घेऊन इतर शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरले आहेत.