विदर्भात शेडे-नेट शेतीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:44 PM2018-08-13T16:44:29+5:302018-08-13T16:46:52+5:30
अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे.
अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विभागासह कृषी विज्ञान कें द्राचा मोठा वाटा आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यत शेकडो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. येत्या वर्षात प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानामुळे तापमान, आर्द्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक पिकांच्या अवस्थेनुसार कमी अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कार्बनडॉय आॅक्साईड इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न मोकळ्या वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाऊससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाले आहे.
पॉली हाऊसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळ वारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात.
या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. शेतकºयांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फूलशेती, भाजीपाला लागवड, तसेच हरित गृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीचे तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात आहे. अकोला जिल्ह्यात शेडनेट ेशती वाढली असून, यावर्षींच्या उद्दीष्टानुसार आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांना लॉटरी पध्दतीने शेड-नेट योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे बिगरमोसमी उत्पादन घेता येत असून, पिकाला चांगले भाव मिळतात, संशोधन, दुर्मीळ वनस्पतीचे संगोपन तसेच बीजनिर्मिती व रोपनिर्मितीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांना हे तंत्रज्ञान प्रशिक्षणातून दिले जात आहे. आतापर्यंत शेकडो शेतकºयांना हे प्रशिक्षण दिले.
- डॉ. दिलीप मानकर,
संचालक,
कृषी शिक्षण विस्तार,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.