शेतकऱ्यांचा देशी कपाशीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:58 PM2019-04-17T13:58:06+5:302019-04-17T13:58:11+5:30
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ०८१ देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ०८१ देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून, शेतकºयांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठाने यावर्षी ४० क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशी बीटीच्या यशस्वी संशोधनानंतर पुढच्या वर्षी याच कृषी विद्यापीठाच्या ०८१ सह एकेएच-५, एकेएच-७ या बियाण्यांमध्ये बीटी जीनचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. दरम्यान,यासाठी महाराष्ट्र बियाणे (महाबीज) महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक मंगळवारी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संचालक, शास्त्रज्ञांसोबत पार पडली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीदेखील स्वत: विकसित केलेल्या ०८१ या वाणावर प्रयोग केले. बुटकी, १४० ते १४५ दिवसांत लवकर येणाºया या उथळ ते मध्यम जमिनीसाठी योग्य असून, या वाणाचे प्रात्यक्षिक घेतले, तेव्हा एकरी १० क्ंिवटल उत्पादन मिळाले आहे. यासाठी अतिघनता लागवड पद्धत वापरण्यात येऊन एकरी ४० हजार झाडे लावण्यात आली. या कापसावर रस शोषण कराणाºया किडींचा प्रादुर्भाव होत नसून, १४० दिवसांत हा कापूस काढला जात असल्याने कापूस काढलेल्या क्षेत्रावर दुबार पेरणी करता येते, हे विशेष. ०८१ रस शोषण करणाºया किडीला प्रतिबंधक आहे. ०८१ हे सरळ बियाणे एकदा घेतले, की ते तीन वर्षांपर्यंत स्वत:चे बियाणे तयार करू न वापरता येते. इतरांना देऊन क्षेत्र वाढविता येते. त्यामुळेच देशी कापूस पेरणीकडे शेतकºयांचा कल आहे. म्हणूनच यापर्षी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कपाशीचे ४० क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ. पंदेकृविच्या कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. डी. टी. देशमुख यांनी दिली.
यावर्षी देशी बीटी कापसाचे ५० हजार पॅकेट शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जाणार आहेत. तद्वतच ०८१, एकेएच-५, एकेएच-७ या देशी कपाशीमध्ये बीटी जीन टाकण्यात येणार आहे. त्यासाठीचा लवकरच ‘सीआयसीआर’सोबत करारनामा केला जाणार आहे.
सुरेश पुंडकर,
महाव्यवस्थापक (उत्पादन),
महाबीज, अकोला.