शेतकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 07:44 PM2017-09-25T19:44:32+5:302017-09-25T19:44:32+5:30

शिर्ला : पातूर तालुक्यातील अनेक लाभार्थीच्या विहिरींचे पैसे  परस्पर हडप केल्याच्या प्रकरणांची चौकशी करून २0  दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश पातूर पंचायत  समितीच्या विशेष सभेने २५ सप्टेंबर रोजी गटविकास  अधिकार्‍यांना दिला.

Farmers 'wells' money was withdrawn! | शेतकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर काढले!

शेतकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर काढले!

Next
ठळक मुद्देविशेष सभेत चौकशीचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : पातूर तालुक्यातील अनेक लाभार्थीच्या विहिरींचे पैसे  परस्पर हडप केल्याच्या प्रकरणांची चौकशी करून २0  दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश पातूर पंचायत  समितीच्या विशेष सभेने २५ सप्टेंबर रोजी गटविकास  अधिकार्‍यांना दिला.
पातूर पंचायत समितीच्या  १२ सप्टेंबरला पार झालेल्या  सभेनंतर पंधरवाड्यातच २५सप्टेंबरला दुपारी ३ वाजता  सभापती सविता सिध्दार्थ धाडसे यांच्या दालनात शिक्षण  आणि नरेगाच्या विषयावर सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये तालुक्यातील विवरा व सुकळी येथील काही शे तकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर हडप केल्याचा आरोप  पं.स. सदस्य प्रमोद देशमुख यांनी केला. त्याला उपस्थित  सद्स्यांनी पाठींबा दर्शविला. त्यामुळे सभापतींनी गट विकास  अधिकारी शेखर शेलार यांना पुढील २0 दिवसात सदर  बाबींची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास  सांगितले.त्याबरोबरच उर्वरीत शेतकर्‍्यांचे विहिरींचे पैसे ता त्काळ जमा करण्याबाबत सभेने निर्देश दिला.
या विशेष सभेला सभापती सविता सिध्दार्थ धाडसे, उपसभा पती नईमाबानो शे.मोबीन,प्रमोद पंजाबराव देशमुख,  मणकर्णाबाई शंकर चिपडे,संजिव लोखंडे, सुशिलाबाई का पकर हे सदस्य उपस्थित होते. मात्र तीन सदस्य अनुपस्थित  होते.

Web Title: Farmers 'wells' money was withdrawn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.