शेतक-यांना मिळणार सौरशक्ती कृषिपंप !
By admin | Published: September 10, 2015 01:50 AM2015-09-10T01:50:28+5:302015-09-10T01:50:28+5:30
संरक्षित ओलितासाठी शासनाचा उपक्रम; अनुदान तत्त्वावर होणार वितरण.
अकोला: पाणी आहे, पण वीज नाही, अशी अनेक ठिकाणी शेतकर्यांची अवस्था आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून शेतकर्यांना सौरशक्ती कृषिपंप उपलब्ध करू न देण्याचे नियोजन केंद्रीय कृषी व शेतकरी कामगार मंत्रालयाने नियोजन केले असून, राज्य शासनाच्या माध्यमातून हे सौरशक्ती पंप शेतकर्यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न दिले जाणार आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाने शेती यांत्रिकीकरणावर भर दिला असून, शेतकर्यांपर्यंत ही यंत्रे पोहोचविण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. सौरशक्ती हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लाखो शेतकर्यांच्या शेतापर्यंत अद्याप वीज पोहोचली नाही. कृषिपंपाचा अनुशेष वाढला आहे. यावर कायमस्वरू पी तोडगा काढण्यासाठी शासनाने सौरशक्ती कृषिपंपाची योजना आखली आहे. सौरशक्ती पंप महागडे असून, हे खरेदी करणे शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने हे कृषिपंप शेतकर्यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न देण्याचे ठरविले आहे. लाखो शेतकर्यांनी शेततळे, बोअरवेल, विहिरी शेतात केल्या आहेत. पण, वीज नसल्याने ते पिकाला पाणी देऊ शकत नाहीत किंवा पावसाचा खंड पडला तरी शेतकर्यांना विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकर्यांच्या डोळ्य़ादेखत पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांकडे पाण्याची व्यवस्था व वीजही उपलब्ध आहे; परंतु भारनियमनामुळे शेतकर्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. या महागड्या सौरशक्ती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकर्यांना परवडेल, या अनुषंगाने शासनाने योजना आखली असून, सौरशक्ती कृषिपंप शेतकर्यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न देण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्य शासनाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सौरशक्ती पंपामुळे दुर्गम भागात राहणार्या शेतकर्यांना मोठा लाभ घेता येणार आहे. आता तर शासनाने मागेल त्याला विहीर व शेततळे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सौरशक्ती कृषिपंपाची गरज वाढणार आहे. महाराष्ट्र महाऊर्जा विकासतर्फे या सौरशक्ती कृषिपंपाचे परीक्षण केले जात आहे.