शेतक-यांना आता घरपोच मिळतील माती परीक्षणाचे अहवाल!

By admin | Published: April 6, 2015 02:07 AM2015-04-06T02:07:19+5:302015-04-06T02:07:19+5:30

विद्यार्थींच घेणार प्रत्यक्ष शेतात जाऊन मातीचे नमुने.

Farmers will now get home-based soil review report! | शेतक-यांना आता घरपोच मिळतील माती परीक्षणाचे अहवाल!

शेतक-यांना आता घरपोच मिळतील माती परीक्षणाचे अहवाल!

Next

अकोला : चांगले आणि भरघोस उत्पादन काढायचे असेल तर माती परिक्षण अगत्याचेच नव्हे तर माती परिक्षण हा शेतीचा मुळ गाभा आहे.पण याकडेच दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्‍यांना त्याचा उत्पादनाच्याबाबतीत चांगलाच तोटा सहन करावा लागत आहे. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांंनी स्वत:च शेतात जावून मातीचे नमुने घ्यायचे आणि या नमुण्याचे परीक्षण झाल्यानंतर ते थेट शेतकर्‍यांना घरपोच देण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे. याची सुरू वात अकोला जिल्हय़ातून करण्यात आली आहे. माती हा शेतकर्‍यांचा जिव्हाळ्य़ाचा प्रश्न आहे. या मातीत सोळा सुक्ष्म अन्नद्रव्य असून, शेतीचे व्यवस्थीत नियोजन केले जात नसल्याचे प्रत्येक पावसाळ्य़ात शेतातील माती आणि त्यासोबतच सोळा सुक्ष्मअन्न द्रव्य वाहून जात आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याने कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने शेताची बांधबधीस्ती करण्याचे काही नवे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सांगीतले आहेत. उताराला आडवी पेरणी, कंटुर, गादी वाफा पध्दतीने शेती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.पण हे सर्व तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी माती परीक्षण करणे अगत्याचे असल्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी यावर्षी माती परिक्षण करावे, यावर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने भर दिला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संकल्पनेतील अनुभवातून शिक्षण उपक्रमातंर्गत या कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी थेट बांधावर जावून माती व पाणी परीक्षण करतील. या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी ह्यसमुध्दी रथह्ण तयार केला आहे. हा रथ गावागावात जाईल. विद्यार्थी माती परीक्षणाचे नमुने घेतील. या रथाव्दारे शनिवारपर्यंत अकोला तालुक्यातील सिंदखेड येथील २४0 शेतकर्‍यांच्या शेतातील मातीचे नमुने घेण्यात आले आहे. हे विद्यार्थी स्वत: या मातीचे प्रयोग शाळेत पृथ्थकरण करू न परिक्षणाचे अहवाल शेतकर्‍यांच्या घरी पोहचून देणार आहेत.

Web Title: Farmers will now get home-based soil review report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.