शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:02 PM2017-11-14T20:02:12+5:302017-11-14T20:02:35+5:30

तेल्हारा येथील शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.

Farmer's Woman and Farmer's Suicide | शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

Next
ठळक मुद्देतेल्हारा व भांबेरीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा येथील जिजामाता नगरात राहणार्‍या पुष्पा घ्यार या शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून तिच्या राहत्या घरात नाटेला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने  घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनादेखील १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.
तेल्हारा शहराच्या जिजामाता नगरातील रहिवासी पुष्पा नथ्थूजी घ्यार या ५0 वर्षीय  शेतकरी महिलेने सततची नापिकी व थकीत कर्जास कंटाळून तिच्या राहत्या घरात  १४ नोव्हेंबरच्या सकाळपुर्वी कधीतरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या  शेजारी असणारे मंगेश लाहोडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बराच वेळ होऊनही  पुष्पाबाईने घराचे दार न उघडल्याने त्यांच्या घराच्या दरवाजामधून आत बघितले,  तेव्हा त्यांना पुष्पाबाईने घरात नाटेला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे  आढळून आले. या घटनेबाबत हरिदास इंगोले यांनी तेल्हारा पोलिसांत फिर्याद दिली.  त्याची तातडीने दखल घेऊन ठाणेदार सचिंद्र शिंदे, उपनिरीक्षक नागोराव भांगे यांनी  घटनास्थळी पोहोचून चौकशी केली व पंचनामा केला. सदर महिलेच्या नावाने तीन  एकर शेती असून, तिच्या अंगावर १५ हजार रुपयांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या तेल्हारा शाखेचे कर्ज आहे. तसेच काही हजारांचे खासगी कर्जदेखील  आहे. सदर महिलेचे पती हे शेतमजुरी करतात. मृतक शेतकरी महिलेच्या पश्‍चात प ती, एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे. 
 तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत भांबेरी येथील गजानन रामराव तायडे या ३५ वर्षीय  शेतमजुराने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची १४ नोव्हेंबर  रोजी उघडकीस आली. या घटनेबाबतची फिर्याद देवीदास किसन तायडे यांनी १४  नोव्हेंबर रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून तेल्हारा पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्या पश्‍चात  पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  जानराव सोळंके करीत आहेत.
 

Web Title: Farmer's Woman and Farmer's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.