अन्नदात्यांसाठी एक दिवस उपवासाचा

By admin | Published: March 21, 2017 02:13 PM2017-03-21T14:13:49+5:302017-03-21T14:13:49+5:30

वाशिम: येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थेच्यावतीने १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा उपक्रम राबविण्यात आला.

Fasting a day for the grainers | अन्नदात्यांसाठी एक दिवस उपवासाचा

अन्नदात्यांसाठी एक दिवस उपवासाचा

Next

राजरत्न संस्थेचा उपक्र म: शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न

वाशिम: येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थेच्यावतीने १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा उपक्रम राबविण्यात आला.
राजरत्न संस्था मागील दोन वर्षांपासून एक मूठ धान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचे मत परिवर्तन करून त्यांना मानसिक आधार देऊन आत्महत्या करू नका, असा संदेश अशा उपक्रमांतून ही संस्था देत आहे. याच उपक्रमांतर्गत जगाच्या पोशिंद्यासाठी एक दिवस उपवासाचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी गव्हाण या खेड्यातील शेतकरी साहेबराव कर्पे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्या केली होती. त्या दिवशी सकाळी साहेबराव कर्पे हे पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबा भावेंच्या पवनार आश्रमात गेले. रात्री जेवणात विष कालवले आणि मृत्यूला कवटाळले. ही महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली शेतकरी आत्महत्या. त्यानंतर साहेबराव यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या जीवनातील मरण यातना संपाव्यात यासाठी राजरत्न संस्थेच्या वतीने त्यांचे उद् बोधन करण्यासाठी एक अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा हा उप्रकम राबविण्यात आला आहे. सर्वच स्तरातील कामगार, अधिकाऱ्यांपेक्षा बळीराजाच्ला अग्रस्थानी ठेवत त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा, नैसर्गिक संकटांशी दोन हात करता यावे, या उद्देशासह शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राजरत्न संस्था करीत आहे.

Web Title: Fasting a day for the grainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.