एसटी कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:27 PM2020-01-20T18:27:18+5:302020-01-20T18:27:27+5:30
कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले.
अकोला: अकोला विभागातील एस. टी. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर वारंवार पाठपूरावा करूनही प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने मान्यताप्राप्त कामगार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले.
एस. टी. कामगारांच्या वैयक्तिक व सामूहीक प्रश्नांबाबत कामगार संघटना गत आठ महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. संघटनेचे प्रादेशिक सचिव विजय साबळे विभागीय अध्यक्ष कैलास नादूरकर विभाग सचिव रूपम वाघमारे, देवानंद पाठक, मनिष तिवारी, विकास डूबूले यांनी विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्याशी चर्चा केली; परंतू एकाही प्रश्नावर अंतीम तोडगा निघाला नाही. अकोला विभागातील विषेश अनूषेश भरती मोहिमेत लागलेल्या चालकांना समयवेतन श्रेणीवर घेणे, नादूरूस्त ईटीआयएम मशिनमूळे कीमी रद्द होऊन झालेल्या नूकसानाची भरपाई ट्रायमेक्स कंपनीकडून करणे, शिपाई पदावर सेवाजेष्ठता डावलून नियमाबाह्य केलेल्या बढत्या रद्द करून पात्र कमॅचार्यांना त्वरित बढती देणे, वाहतूक नियंत्रक म्हणून परिक्षा उत्तीर्ण असलेल्या वाहकांना त्वरित बढती देणे, चालक वाहकांच्या रजा स्विकारणेबाबत आगार स्तरावर उपाययोजना सहवार्षिक वेतनवाढ, निवडश्रेणीचा लाभ देणे, आदी मागण्यांसाठी संघटनेच्या कामगारांनी उपोषणास प्रारंभ केला.