अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पीता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 02:51 PM2019-01-20T14:51:56+5:302019-01-20T14:53:08+5:30
कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्याळा ते कान्हेरी (गवळी) दरम्यान असलेल्या अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ रविवार, २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्याळा ते कान्हेरी (गवळी) दरम्यान असलेल्या अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ रविवार, २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. भास्कर लक्ष्मण बोरकर (५५) व ज्ञानेश्वर बोरकर (२५) असे अपघातात ठार झालेल्या पीता-पुत्राचे नाव आहे.
कान्हेरी (गवळी) येथील भास्कर बोरकर हे पारस येथील विद्युत प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा भास्कर याची रविवारी जळगाव (खांदेश) येथे पोलीस भरतीची परीक्षा असल्याने दोघे पीता-पुत्र रेल्वे पकडण्यासाठी अकोल्याकडे आपल्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलद्वारा पहाटेच रवाना झाले. दरम्यान, राष्ट्रीय महाार्गावरील अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ त्यांच्या मोटारसाकयला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. यावेळी अंबुजा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निंबाळकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन बाळापूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताच माहीत मिळताच व्याळा चौकीच सहायक पोलिस निरीक्षक देवीदास येऊल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. यावेळी महामार्गावर वातुकीची कोंडी झाली होती. जिल्हा अपर पोलिस अधीक्षक नितीन देशमुख, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी , सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. भास्कर बोरकर यांचे भाऊ रामदास बोरकर यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात बाळपूर पोलिस तपास करीत आहेत.
काळानेच घेतली परीक्षा
भास्कर बोरकर यांना पाच मुली व ज्ञानेश्वर हा एकलुता एक मुलगा होता. ज्ञानेश्वरला हा उच्च शिक्षण देण्यासाठी भास्कर बोरकर हे धडपड करत होते. रविवारी ज्ञानेश्वरची परीक्षा जळगाव खांदेश येथे होती. मुलाला रेल्वेत बसवून देण्यासाठी भास्कर हे त्याला घेऊन मोटारसायकलद्वारे अकोला येथे जात होते. परंतु, रस्त्यातच काळाने पीता-पुत्रावर घाला घातला. ज्ञानेश्वरचे स्वप्न अपूर्णच राहिले. भास्कर यांच्या पश्चात पाच मुली व पत्नी असा परिवार आहे.