बँक एटीएममधून कोरोना संसर्गाची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:24 AM2021-06-09T04:24:05+5:302021-06-09T04:24:05+5:30
बँकांनी एटीएम ग्राहकांसाठी सॅनिटायझर व हॅण्डवॉश उपलब्ध करून दिले नाही. कोरोना विषाणूच्या काळात प्रत्येक एटीएम स्थळी सॅनिटायझर, हॅण्डवॉश असणे ...
बँकांनी एटीएम ग्राहकांसाठी सॅनिटायझर व हॅण्डवॉश उपलब्ध करून दिले नाही. कोरोना विषाणूच्या काळात प्रत्येक एटीएम स्थळी सॅनिटायझर, हॅण्डवॉश असणे गरजेचे आहे. मात्र शहरातील बहुतांश एटीएम केंद्रावर ही सुविधा नाही. पैसे काढण्यासाठी येणारे नागरिक सुरक्षित अंतर पाळत नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शहरात स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सेस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकांचे एटीएम मूर्तिजापूर शहरात आहेत. एटीएम केंद्रावरील वातानुकूलित यंत्रे कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. काही ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने एटीएम बेवारस पडले आहेत. साफसफाई केल्या जात नसल्याने एटीएममध्ये अस्वच्छता पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँक आणि एजन्सीचा निष्काळजी कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे बँक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.