कोरोनाची धास्ती, प्रमाणपत्रासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांची फरफट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:17+5:302021-02-26T04:25:17+5:30
अपंग प्रमाणपत्र कशासाठी? दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ, उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची सवलत, आवश्यकतेनुसार लेखनिक देणे बंधनकारक आहे. अंशत: अंध, अस्थिव्यंग ...
अपंग प्रमाणपत्र कशासाठी?
दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ, उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची सवलत, आवश्यकतेनुसार लेखनिक देणे बंधनकारक आहे.
अंशत: अंध, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना आकृत्या किंवा नकाशावर आधारित प्रश्न सोडवण्यास सवलत.
श्रवणदोष, वाचादोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे यासंबंधीच्या चुका ग्राह्य धरण्यासह इतर सवलतींसाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे.
दररोज ५० प्रमाणपत्रांचे वितरण
सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या प्रस्तावानुसार विद्यार्थी आणि इतर दिव्यांग व्यक्तींची संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. यात अस्थिव्यंग, श्रवणदोष, दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींचा समावेश असून, पूर्ण तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडल्यानंतर दरदिवशी ५० पेक्षा जास्त दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जाते.
गत महिन्यापासून सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग कक्ष सुरू करण्यात आले आहे. अनेकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया प्राधान्याने केली जात आहे. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी गरजेनुसार उपाययोजना केल्या जात आहेत.
- डाॅ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय निरीक्षक, जीएमसी,अकोला