अकोल्यात निर्भय मॉर्निंग वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:34 AM2017-08-21T01:34:18+5:302017-08-21T01:34:32+5:30

अकोला :  अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र युवा परिषद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी जागर मंच, सर्वोदय मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ आदी संघटनांच्यावतीने आज अशोक वाटिका ते श्री शिवाजी पार्क निर्भय मॉनिर्ंग वॉक काढण्यात आला. ‘जबाब दो’ आंदोलनाने रविवारी सकाळी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

Fearless Morning Walk in Akolay | अकोल्यात निर्भय मॉर्निंग वॉक

अकोल्यात निर्भय मॉर्निंग वॉक

Next
ठळक मुद्देदाभोळकरांच्या मारेकर्‍यांना अद्याप अटक नाही अशोक वाटिकेपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र युवा परिषद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी जागर मंच, सर्वोदय मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ आदी संघटनांच्यावतीने आज अशोक वाटिका ते श्री शिवाजी पार्क निर्भय मॉनिर्ंग वॉक काढण्यात आला. ‘जबाब दो’ आंदोलनाने रविवारी सकाळी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
      महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, जिल्हाध्यक्ष प्रशांत गावंडे, बी.एस. इंगळे, अजाबराव ताले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके, प्रधान सचिव बबनराव कानकिरड,भाकपचे कॉ.रमेश गायकवाड, कॉ. रामचंद्र धनभर, अर्जुनराव घुगे बंधू, विद्या भगतसिंग राणे, श्रीकृष्ण माळी, पंजाबराव वर, डॉ. प्रवीण वाघमारे, गजानन ढाले, ओरा श्रावण चक्रे, अर्जुनराव गुळधे, छात्रभारतीचे गोविंद राणे, विलास टाळीकुटे, विवेकवाहिनीचे रोहण बुंदेले, जयश्री भुईभार, विधी सल्लागार अँड. अमोल चक्रे, महाराष्ट्र युवा परिषदेचे चंद्रशेखर डोईफोडे, अक्षय जंजाळ, जयशन गुळधे, जीवन दारोकार, बाळ काळणे यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येत सहभागी झाले होते.

Web Title: Fearless Morning Walk in Akolay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.