खड्डे बुजवा, अडथळे दूर करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:19 PM2018-09-17T13:19:07+5:302018-09-17T13:21:29+5:30
अकोला : शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
अकोला : शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
२३ सप्टेंबर रोजी शहरातील श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, तहसीलदार विजय लोखंडे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाºयांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, २३ सप्टेंबरपूर्वी शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यासोबतच नाल्यांची दुरुस्ती केबल व टेलिफोनच्या जोडण्या (वायर) हटवून अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले. गणेश विसर्जन मिरवणुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होता कामा नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावेळी दिल्या.
प्रत्येक प्रभागात पाण्याचे टाके ठेवा!
पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात गणेश विसर्जनाकरिता तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे टँक (टाके) ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाºयांना दिल्या.
गणेश विसर्जन मार्गाची अशी केली पाहणी!
शहरातील गणेश विसर्जन मार्गाच्या पाहणीत जिल्हाधिकाºयांनी सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, दगडी पूल, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, जुने अकोट स्टॅन्ड, सुभाष चौक, सिटी कोतवाली मार्गे गणेश घाटाची पाहणी केली.