जमिनीची सुपीकता घटतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 08:43 PM2019-03-30T20:43:11+5:302019-03-31T12:21:48+5:30
अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत.
- राजरत्न सिरसाट
अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात केंद्र सरकार पुरस्कृत संशोधन प्रकल्पामध्ये भौगालिक स्थळ व माहिती प्रणाली आधारित अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करू न हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्था यांनी या प्रकल्पाला निधी उपलब्ध करू न दिला आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ४,४६४ माती नमुन्यांच्या आधारे विदर्भातील जमिनीची सुपीकता तपासण्यात आली. या निष्कर्षावरू न विदर्भातील जमिनींमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४०, गंधक २०.४५ व जस्त ५०.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्याचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण याआधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. ही धोक्याची घंटा आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार विविध संसाधनाचा वापर करू न जमिनीचे आरोग्य सुधारणे हाच एक उपाय आहे. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्वत उत्पादकतेसाठी गरजेचा आहे. वाढत्या सूक्ष्म व दुय्यम अन्नदव्याचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीतील पोषक जीवाणूंचे प्रमाण घटले आहे. त्याचा परिणाम मानवी जीवन व जनावरांवर झाला आहे. २४ ते ४५ वयोगटातील महिलांमध्ये लोह, गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू न शेतपोत सुधारण्याची महत्त्वाची जबाबदारी संशोधकांवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर माती परीक्षण व शेत मातीचे आरोग्यपत्रिका बनविण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि, या माती परीक्षणाचा फायदा किती झाला, हा संशोधनाचा भाग आहे. राज्यातील कृषी विद्यापीठासह कृषी विभागाने माती परीक्षणावर भर दिला. मातीतील अन्नद्रव्य घटल्याने त्याचा परिणाम पिकांवर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मातीचा सामू बघून शेतकºयांना कोणत्या जमिनीत कोणती पिके घ्यावीत, हे ठरविणे गरजेचे आहे. तथापि, याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने त्याचे परिणाम उत्पादनावर होत आहेत. आता याकडे गांर्भीयाने बघण्याची गरज आहे.