पाणंद रस्त्यांची कामे अडकली आराखड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:23 PM2018-08-29T13:23:22+5:302018-08-29T13:27:13+5:30

अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी गत जूनमध्ये निधी वितरित करण्यात आला; मात्र तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाकडे २८ आॅगस्टपर्यंत सादर करण्यात आला नाही.

fields road works pending in akola district | पाणंद रस्त्यांची कामे अडकली आराखड्यात!

पाणंद रस्त्यांची कामे अडकली आराखड्यात!

Next
ठळक मुद्देकृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे रखडली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत जूनमध्ये जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला.

अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी गत जूनमध्ये निधी वितरित करण्यात आला; मात्र तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाकडे २८ आॅगस्टपर्यंत सादर करण्यात आला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही, पाणंद रस्त्यांची कामे तालुकास्तरावरील कृती आराखड्यात अडकली आहेत.
गत २७ फेबु्रवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्री पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी शासनामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो कक्षामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. वारंवार पत्राद्वारे निर्देश देण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील सातपैकी एकाही तालुक्यातून तहसीलदार व गटविकास अधिकाºयांमार्फत पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा २८ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो कक्षाकडे प्राप्त झाला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे तालुकास्तरावरील कृती आराखड्यात अडकली आहेत.

निधी वितरित; पण कामे रखडली!
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी शासनामार्फत प्राप्त १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत जूनमध्ये जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील कामांसाठी २१ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला; मात्र उपलब्ध निधीतून करावयाच्या कामांचे कृती आराखडे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडून २८ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो कक्षाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे निधी वितरित करण्यात आला असला तरी, पाणंद रस्त्यांची कामे मात्र रखडली आहेत.

 

Web Title: fields road works pending in akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.