भरधाव ट्रकने महिलेस चिरडले

By admin | Published: September 30, 2015 12:41 AM2015-09-30T00:41:12+5:302015-09-30T00:41:12+5:30

अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर भीषण अपघात; महिलेच्या शरीराचा रोडवरच चेंदामेंदा.

The fierce truck hit the woman | भरधाव ट्रकने महिलेस चिरडले

भरधाव ट्रकने महिलेस चिरडले

Next

अकोला: टॉवर चौकातून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या एका दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडत नेल्यामुळे पारस येथील एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोर घडली. सिग्नलवरून निघण्याच्या घाईने ट्रकचालकाने ट्रक भरधाव चालविल्याने सदर महिला ट्रकखाली आली व तब्बल ५0 फुटापर्यंत फरपटत गेली. सुषमा हरिभाऊ गयधर, असे मृत महिलेचे नाव असून, ती पारस येथील रहिवासी आहे. मूळचे पारस येथील तसेच सध्या कृषी नगरमध्ये रहिवासी असलेले हरिभाऊ गयधर व त्यांच्या पत्नी सुषमा मंगळवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास एम एच ३0 एक्स ८४८८ क्रमांकाच्या दुचाकीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव येणार्‍या व ह्यओव्हरलोडह्ण असलेल्या एम एच १८ एए ७0३८ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी बाजूला फेकल्या गेली. दुचाकीवरील सुषमा गयधर ट्रकखाली आल्या तर हरिभाऊ गयधर रस्त्याच्या कडेला पडले. त्यानंतर ट्रकचालकाने ट्रक वेगात चालविल्यामुळे सुषमा गयधर ट्रकखाली चिरडल्या गेल्या. ट्रकच्या समोरील चाकात आल्याने त्यांचे शिर चाकाला लटकले होते तर संपूर्ण शरीर चेंदामेंदा झाले होते. सुषमा गयधर ट्रकखाली असताना ट्रकचालकाने तब्बल ५0 फुटापर्यंत त्यांना फरपटत नेल्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर रोडला चिपकले होते. यावेळी गयधर यांचा केवळ डावा पाय व डोक्यावरील केसच रस्त्यावर दिसत होते. अपघातानंतर हरिभाऊ गयधर यांना पत्नी दिसत नसल्याने त्यांनी पत्नीला आवाज देत आकांड-तांडव केले. काही क्षणातच पत्नीचा मृतदेह ओळखताही न आल्याने हरिभाऊ यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तत्काळ सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. भयंकर घडलेल्या या अपघातात गयधर यांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा बघून मध्यवर्ती बसस्थानकासमोरील नागरिकांचे डोळे पाणावले होते.

*ट्रकचालकास झोडपले

भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकीस चिरडणार्‍या ट्रकचालकाला अपघातानंतर नागरिकांनी थांबवून बेदम मारहाण केली. केवळ सिग्नल ओलांडण्यासाठी केलेल्या या घाईमुळे एका महिलेला प्राणास मुकावे लागले. अपघाताची भीषणता लक्षात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दोषी ट्रकचालकास बेदम मारहाण करून सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

*रामदास वानखडेंची अशीही माणुसकी

पातूर तालुक्यातील आलेगाव कार्ला येथील रहिवासी रामदास शिवराम वानखडे यांनी सुषमा गयधर यांच्या सडा पडलेल्या मृतदेहाच्या मांसाचे तुकडे वेचून जमा केले. त्यानंतर त्यांच्या शरीराच्या मांसाचे तुकडे एका पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. कुणाशीही परिचित नसलेल्या रामदास वानखडे यांनी मृतदेहाचे तुकडे सावडण्यासाठी केलेली धडपड पोलीसही बघत राहिले. एकीकडे माणुसकी हरविलेली माणसे अपघाताचे फोटो काढण्यासाठी उड्या मारत असताना रामदास वानखडे मात्र गयधर यांच्या शरीराचे मांस गोळा करण्यात व्यस्त होते. संपूर्ण मृतदेह जमा करून पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी माणुसकी म्हणून आपण स्वत:हून पुढाकार घेतल्याचे सांगितले.

*फोटो काढण्यासाठी आटापिटा

अपघात झाल्यानंतर एकीकडे मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू असतानाच काही नागरिक व युवक मात्र अपघाताचे फोटो काढण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दिसून आले. फोटो काढणार्‍यांच्या या नादात वाहतूक विस्कळीत होत होती तर पोलिसांनाही अडचणी निर्माण झाल्या होता. रस्त्यावर पडलेले मांसाचे तुकडे पाहून हरिभाऊ गयधर पत्नीला बघण्यासाठी रडत होते. रामदास वानखडे मृतदेह गोळा करीत होते, तर माणुसकी हरविलेले काही जण फोटो काढण्यास वाद घालत होते.

Web Title: The fierce truck hit the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.