‘जीआरपी’च्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:47 PM2018-11-14T12:47:30+5:302018-11-14T12:47:31+5:30

अकोला: रेल्वे स्टेशन परिसरातील ‘जीआरपी’ पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला.

fight between Two GRP employees | ‘जीआरपी’च्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद!

‘जीआरपी’च्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद!

Next


अकोला: रेल्वे स्टेशन परिसरातील ‘जीआरपी’ पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला. वादातून दोघांनीही एकमेकांना मारहाण करायला काही युवकांना बोलाविले; परंतु यासंदर्भात कोणीही काही बोलायला तयार नाही.
जीआरपी ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी मद्यधुंद असल्यामुळे त्याचा एका पोलीस कर्मचाºयासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला. दोघांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या. हा वाद वाढत गेल्यामुळे दोघांनीही एकमेकांना मारहाण करण्यासाठी काही युवकांना बोलावून घेतले. त्यामुळे दोन पोलीस कर्मचाºयांचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले. हा वाद वाढत असताना, परिसरात मोठी गर्दी झाली होती. इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविला, अन्यथा पोलीस ठाण्यात वाद झाला असता. जीआरपीचे ठाणेदार प्रवीण वांगे हे रजेवर असल्याने त्यांना याविषयी कोणतीही माहिती नसल्याने, त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करतात. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारीच कायदा हाती घेऊन पोलीस ठाण्यात हैदोस घालत असतील, तर ठाण्यावर अधिकाºयांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते. आता वरिष्ठ अधिकारी या दोघा पोलीस कर्मचाºयांवर काय कारवाई करतात, याकडे पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.
 

घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस ठाण्यात आलो; परंतु कोणत्या कर्मचाºयांमध्ये वाद झाला, याची माहिती नाही. कोणत्या कर्मचाºयाने मद्यधुंद अवस्थेत हैदोस घातला, वाद उपस्थित केला, याबद्दल माहिती नाही.
- राहुल मोरे, प्रभारी ठाणेदार, जीआरपी.

 

Web Title: fight between Two GRP employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.