कोरोनाशी लढा; २८ दिवसांपर्यंत अकोट फाइल प्रतिबंधित क्षेत्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:41 PM2020-04-28T17:41:26+5:302020-04-28T17:42:37+5:30
पुढील 28 दिवसांपर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
अकोला : शहरातील उत्तर झोन अंतर्गत येणाऱ्या अकोटफाइल परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला 30 वर्षीय रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला. चाचणी दरम्यान या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला 27 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात रुग्णालय प्रशासनाने घरी जाण्याची अनुमती दिली. असे असले तरीही पुढील 28 दिवसांपर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सात एप्रिल रोजी उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे आठ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया अकोट फाइल परिसरात आढळून आला होता. कोरोना विषाणूच्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस कापडणीस यांनी पुढील 28 दिवसांपर्यंत म्हणजेच 25 मे पर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुन्हा बाधीत होण्याचा धोका?
संपूर्ण जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेले रुग्ण उपचारादरम्यान पूर्णपणे बरे झाल्यानंतरही संबंधित रुग्णांनी घरांमध्येच 14 दिवस वेगळे राहणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोनातून मुक्त झालेल्या अकोटफाइल परिसरातील युवकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असली तरीही शासनाच्या निर्देशानुसार पुढील 28 दिवसांपर्यंत अकोटफाइल भागातील प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार आहे. यादरम्यान नागरिकांना कोणतीही सवलत देण्यात आली नाही, हे निश्चित समजावे.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा