कोरोनासोबतच डेंग्यूसोबतही द्या लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:29 AM2020-05-16T10:29:43+5:302020-05-16T10:29:56+5:30
कोरोनासोबतच डेंग्यू विरूद्धची लढाई लढावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
अकोला : सद्या सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे नागरिक आवश्यक खबरदारी बाळगत आहेत. मात्र, त्याच सोबत डेंग्यू या विषाणूजन्य आजाराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता पाळून कोरोनासोबतच डेंग्यू विरूद्धची लढाई लढावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी नागरिक जशी स्वत:ची काळजी घेत आहेत,तशीच काळजी डेंग्यूला हरविण्यासाठी घेण्याची गरज आहे. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पिण्याची भांडी नियमीत स्वच्छ करा. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवा. शिवाय, घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून ठेवू देऊ नका. येवढी सतर्कता पाळल्यास डेंग्यू विरूद्धची लढाई नक्कीच जिंकता येईल.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे
तीव्र ताप येणे व डोके दुखणे
सांधे व अंग दुखी
अंगावर लालसर व्रण वा पुरळ येणे
डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे
रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे
या उपाय योजना करा
घराभोवती व परिसरामध्ये सांडपाणी साचू न देणे
साचलेली डबकी वाहती करणे किंवा बुझवणे
घरांच्या खिडक्यांना डास रोधी जाळ्या बसविणे
सर्व पाणी साठ्यांना घट्ट झाकण बसविणे
झोपतांना मच्छरदाणी चा वापर करणे
परिसरातील खराब टायर, फुटक्या प्लास्टिक कॅन, डबे,प्लास्टिक कप, फुटके माठ नष्ट करावे
एक दिवस कोरडा पाळावे
सर्व गटारे व नाल्या वाहती करावे
सन २०१६ पासून डेंगी आजार हा शासनाने अधिसूचित म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जिल्'ातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये मध्ये दाखल होणाºया डेंग्यू ताप सदृश्य रुग्णांची माहिती हिवताप कार्यालय कडे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच संदिग्ध डेंगी ताप रुग्ण चे रक्तजल नमुने मोफत विषाणू परिक्षणासाठी पाठविण्यात यावे, जेणेकरून संबंधित परिसरामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण करवून घेण्यास मदद होईल.
डॉ.कमलेश भंडारी, सहाय्यक संचालक, हिवताप विभाग, अकोला
डेंगी ताप पसरविणारा एडिस डास हा स्वछ पाण्यावर अंडी घालणारा असल्याने जर नागरिकांनी आपापल्या घरामधील पाणी साठवणीच्या सर्व भांड्यांना झाकण वा कापड बांधून ठेवल्यास 'ा डासांचे जीवन चक्र पूर्ण होणार नाही. तसोच डासांच्या उत्पत्तीवर आळा बसेल.
डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला