महावितरणच्या मालमत्तेवर पोस्टर, बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:09+5:302020-12-28T04:11:09+5:30
शहराचे विद्रुपीकरण करणारे तथा सुरळीत वीजपुरवठ्याला अडथळा ठरणारी पोस्टर्स,बॅनर्स,तथा प्रचार साहित्ये लावल्याप्रकरणी शहरातील विविध,संस्था,व्यावसायिक व जाहिरातदारांना महावितरणकडून बजावण्यात आलेल्या ...
शहराचे विद्रुपीकरण करणारे तथा सुरळीत वीजपुरवठ्याला अडथळा ठरणारी पोस्टर्स,बॅनर्स,तथा प्रचार साहित्ये लावल्याप्रकरणी शहरातील विविध,संस्था,व्यावसायिक व जाहिरातदारांना महावितरणकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांना प्रतिसाद देत अनेकांनी आपले प्रचार साहित्ये हटविली आहेत. तसे महावितरणला पत्र देऊन रितसर कळविले आहे. तथापी, अजूनही काही संस्था,व्यावसायिक किंवा जाहिरात एजन्सींनी महावितरणची नोटीस स्वीकारली नाही.
महावितरणची नोटीस स्वीकारली नाही त्यांना एक संधी म्हणून जाहिरात फलकावरील संपर्कासाठी लावण्यात आलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅपव्दारे नोटीस व माहिती पाठविण्याचे काम उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये आणि त्यांच्या चमूने केले आहे.
महावितरणच्या नोटीसची दखल न घेणारे, फलके,पोस्टर्स बॅनर्स काढण्यासंबंधी जाहिरात एजन्सींजना सूचना केल्या आहेत पण, प्रत्यक्षात एजन्सींजकडून त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, अशा संस्था, तसेच काही नवीन जाहिरातदार ज्यांना महावितरणने नोटीस दिली नाही अशा सर्वांवर नवीन वर्षात गुन्हा दाखल करण्याची पूर्ण तयारी अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात विधी विभागाने केली आहे.
- फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी,महावितरण अकोला परिमंडळ