खोटी माहिती देणे भाेवले, गायगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:14+5:302021-07-08T04:14:14+5:30
सरपंच दीपमाला वानखडे व त्यांचे पती यांनी २६ जून २०१५ रोजी खरेदी केलेली १२०० चौरस फूट मालमत्तेची माहिती ३० ...
सरपंच दीपमाला वानखडे व त्यांचे पती यांनी २६ जून २०१५ रोजी खरेदी केलेली १२०० चौरस फूट मालमत्तेची माहिती ३० डिसेंबर २०२० रोजी ग्राम पंचायत निवडणूक अर्जात दिली नाही. तसेच खोटे शपथपत्र सादर केले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दीपमाला वानखडे यांची सरपंचपदी निवड झाली. या संदर्भात ग्राम पंचायत सदस्य स्वराज दिलीप थोटे यांनी राज्य निवडणूक आयोग मुंबईकडे तक्रार दाखल करून सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रकरण बाळापूर तहसीलदार डी. एल. मुकुंदे यांच्याकडे पाठविण्यात आले. या संदर्भात अर्जदार व गैरअर्जदार तसेच गायगाव ग्रामविकास अधिकारी आदींची साक्ष नोंदविण्यात आल्यानंतर २२ जून २०२१ रोजी बाळापूर तहसीलदार मुकुंदे यांनी गायगाव सरपंचाविरुद्ध पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली. याप्रकरणी सरपंच दीपमाला वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.