पातुर शहरात विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:56+5:302021-02-23T04:27:56+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तथा व्यवसायिकांनी कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले. त्यामुळे ...

Filed a case against the unmasked wanderer in Patur city | पातुर शहरात विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

पातुर शहरात विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तथा व्यवसायिकांनी कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले. त्यामुळे रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पथकाने कारवाई केली. या पथकात मुख्याधिकारी सोनाली यादव, देवेंद्र ढोणे, खतीब ऐनुद्दीन, मास्टर जावेद, पोलीस कॉन्स्टेबल बोरकर यांचा समावेश आहे. -----------------------------------

शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील ७४ जणांविरुद्ध कारवाई

शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील दि.१९ फेब्रुवारी ते दि. २१ फेब्रुवारीपर्यंत ७४ जणांविरुद्ध विनामास्क दंडात्मक कारवाई केली. ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांच्या नेतृत्वात अक्षय घाडगे, संजय खर्डे, हेमंत घुगे, प्रमोद उगले, अंबादास इंगळे, आवेज यांचा पथकामध्ये समावेश आहे.

-------------------------------------

खानापूर येथे आणखी ८ पॉझिटिव्ह

पातूर तालुक्यातील खानापूर गावामध्ये एकाच वेळी रविवारी आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

Web Title: Filed a case against the unmasked wanderer in Patur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.