अकोट पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 02:41 PM2020-05-30T14:41:11+5:302020-05-30T17:18:49+5:30
पोलिसांना धमकी देणं महागात पडले, गुन्हा दाखल.
अकोट : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाउनची अंमलबजावणी करणाºया पोलिस कर्मचाºयांच्या कामात अडथळा आणून त्यांना शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी देणाºया अकोट शहरातील एका युवकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ताज शरीफ राणा (३० रा. कांगारपुरा, अकोट) असे या आरोपीचे नाव आहे.
अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अकोट शहरातील शौकत अली चौकात तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाºयांनी लॉकडाउन असताना बाहेर फिरणाºया काही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर पोलिसांना शिविगाळ करत हे युवक पोलिसांना पाय तोडून हातात देऊ, अशी धमकीही देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. शौकत अली चौकाजवळच्या अमीन पुरा भागातील हा व्हिडीओ १७ मे रोजीचा असून,लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओची चौकशी केली असता, ताज शरीफ राणा हा एएसआय राऊत, पोकाँ. वरोठे, पोहेकाँ डामरे यांना अश्लील शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसत आहे. १७ मे रोजी कर्मचारी हे कर्मचारी कर्तव्यावर असताना धारूळवेस भागात पेट्रोलिंग करीत होते. लॉकडाउन असल्याने त्यांनी रस्त्यावर फिरत असलेल्या काही तरुणांना घरी जाण्यास सांगितले असता आरोपीने अश्लील शिवीगाळ करून हात पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी अकोट शहर पोलीस निरिक्षक संतोष महल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस स्टेशनला आरोपी ताज शरीफ राणाविरुध्द भादंवी २६९, २९४,५०४,५०६,१८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.